सुख देवासी मागावे...
या गाण्याच्या ओळी कानावर आल्या आणि लगेच वाटलं की काय काय सुख मागतो आपण सगळीजण देवाकडे ???
आणि गंमत म्हणजे आपल्याला मिळत असलेल्या सुखाकडे आपण अगदी चक्क दुर्लक्ष करतो...
किंवा कदाचित...
खरं तर आपल्याला सुख कळतच नाही...
पहा हं....
आपण मन लावून अभ्यास करतोय... जरासा मेंदू शिणलाय, काहीतरी चवीष्ट खायची इच्छा होतेय...
अगदी नेमकं त्याच क्षणी आई हातात भज्यांची बशी आणून देते !!!
दिवसभर काम करून थकलेले आपण घराच्या ओढीने धावतपळत गाडी पकडतो...
गर्दीच्या वेळ असूनही चढल्यावर चक्क सीट मिळते न पुढचा 45 मिनीटांचा प्रवास आरामात होतो !!!
Radio on करताच आपलं अत्यंत आवडीचं गाणं कानावर पडतं... एवढच नाही ;
हे आपल्या नव्या Radio वर आपण ऐकत असलेलं पहिलं गाणं असतं !!!
जे आपल्याला अगदी अलगद आठवणींच्या जगात घेऊन जातं....
‘आपली आवड’ मधे कोणती गाणी लागतील याचा अंदाज बरोबर ठरला की बक्षीस !
रात्री गाद्या घालायच्या निमित्ताने दार लावून घेऊन बहिणींनी केलेला गरबा,
10 पैशांची 3 जिरागोळीची पाकीटं आणून चवीचवीने खाणे… कित्ती मज्जा !!!
मे महिन्यात आंब्यांची पाटी घेतल्ये,
(आपलं वय जेमतेम 7-8 वर्षच असूनही) त्यातला हवा तो आंबा खायचं स्वातंत्र्य आपल्याला आहे !!!
(यातली गंमत आताच्या काळात कदाचित नाही कळणार)
शाळेत English मधे छान marks मिळवले म्हणून English च्या बाईंनी दिलेलं खास बक्षीस!!!
आपण घरी एकटेच आणि नेमका अंगात ताप...
शेजारच्या आजी येऊन विचारतात, काय जेवशील?? काय देऊ??
वरणभात? की खिचडी?
काहीही, तुम्ही जे केलं असेल ते चालेल….
या आपल्या उत्तरावर सहजतेने म्हणतात तुला ज्याची चव असेल ते सांग, मी तेच करीन
आपण कोणालातरी gift दिल्ये, gift घेताक्षणी ती व्यक्ती म्हणते, तुला कसं कळलं??? मला अगदी ही वस्तू घ्यायचीच होती !!!
आपण tours बरोबर आसामला गेलोय.. आणि अचानक ध्यानीमनी नसताना आपली मैत्रीण तिथे भेटते !!!
पिकनीकला गेल्यावर समोर झोपाळा दिसतो आणि कितीतरी वर्षांनी मनसोक्त झोके घेता येतात...
नदीच्या पाण्यात पाय सोडून बसायला मिळतं...
असे कितीतरी क्षण... सुख देणारे...
हे सगळं वाचताना तुम्हालाही आठवायला लागले ना तुमचे सुखाचे क्षण
तुमचं उत्तर जर हो असेल तर...
माझ्यासाठी हासुद्धा सुखाचा क्षण !!!!!!!!!!!!